मी झाड बोलतोय मराठी निबंध | Mi zad boltoy nibandh marathi | Zadachi atmakatha

Mi zad boltoy nibandh marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून मी झाड बोलतोय हा निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत.
झाडे आपल्या निसर्गाची शोभा वाढवत असतात. मनुष्याला ही झाडे नेहमी उपयोगीच पडतात. कधीही झाडांमुळे मनुष्याला कोणतेही नुकसान होत नाही. परंतु अलीकडे झाडांची संख्या कमी होत आहे. वृक्षतोड अलीकडे जास्त प्रमाणात होत आहे. म्हणून आम्ही या लेखातून मी झाड बोलतोय हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
हे पण वाचा 👉 वाचते होऊया मराठी निबंध | Vachate houya marathi nibandh👈
मी झाड बोलतोय मराठी निबंध | Mi zad boltoy nibandh marathi
होय होय मित्रांनो मी झाड बोलतोय. एका चिमुकल्या मुलाने माझे संगोपन केले. मोठ्या आवडीने माझी काळजी घेत मला मोठे केले. त्या लहान मुलाला माझे महत्व समजले होते. माझे वय आता जास्त झाले आहे. मला तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचे आहे.
आधी माझ्या आजूबाजूला भरपूर झाडे होती. लहान लहान मुले माझी फळे खाण्यासाठी माझ्यावर दगड मारतात आणि माझी फळे मोठ्या आनंदात खात असत. तरीही मी त्या लहान मुलांवर रागवत नाही.
माझ्या फांद्यांना झोका बांधून लहान लहान मुले झोका झोका खेळतात. आता माझ्या शेजारी एक मोठी कंपनी झालीये त्यामुळे माझ्या आजूबाजूची सर्व झाडे नाहीशी करण्यात आली. मला भीती वाटते की मलाही नष्ट करतील की काय?
परंतु झाडे लावा देश वाचवा, झाडे लावा झाडे जगवा या घोषणा ऐकल्या की थोडासा दिलासा मिळतो. काल माझ्या सावलीत शाळेतील मुले गप्पा मारत बसली होती. शाळेतील एका कार्यक्रमात वृक्ष वाटप करण्यात आले त्याबद्दल मुलांच्यात चर्चा चालू होती. असे कार्यक्रम शाळेत आयोजित करतात हे ऐकून मी मनातल्या मनात आनंदित झालो.
मी तर नेहमी तुमच्यासाठी उपयुक्तच आहे. तरीही माझ्या फांद्या कापल्या जातात. तुम्हाला काही लागले तर तुम्ही लगेच आई गं! असे उद्गार काढता तसेच माझेही आहे. माझ्या फांद्या तोडल्या तर मलाही वेदना होतात.
कडक उन्हाळ्यात तुम्ही घामाने जेव्हा ओलेचिंब होता आणि माझ्या फांद्यांखाली येऊन थोडासा विसावा घेता तेव्हा मला खूप छान वाटते. तुम्ही जेव्हा माझे मानभरून कौतुक करता तेव्हा मलाही खूप आनंद होतो.
बाळांनो मी तुम्हाला केवळ सावलीच देत नाही तर मी कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेऊन तुम्हाला जीवनावश्यक स्वछ ऑक्सिजन देत असतो. वातावरणामधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी झाले नाहीतर जागतिक पातळीवर तापमान वाढीच्या समस्येला समोर जावे लागेल.
मी नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार असतो. मी मातीला घट्ट पकडून ठेवतो त्यामुळे मातीची होणारी धूप कमी होते. मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे माझ्यामुळे आणि माझ्या आजूबाजूच्या झाडांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे कितीतरी आजारांवर, रोगांवर औषधे उपलब्ध होतात.
मी झाड बोलतोय मराठी निबंध | Mi zad boltoy nibandh marathi
झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा ऐकल्या मला तुमचा खूप अभिमान वाटतो. माझी काळजी घेण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात. सरकार झाडे वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवतात हे पाहून मला खूप आनंद वाटतो. लहान मुले आवडीने माझ्या आजूबाजूला झाडे लावतात. आम्ही झाडे तर सर्वांच्या मदतीला येतो मग आम्हाला का तोडले जाते?
विकास करणे गरजेचे आहे पण आमचे अस्तित्व टिकणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. आम्हाला तोडून कंपन्या, रोड मॉल तयार करून विकास तर होतोय पण आमची संख्यासुद्धा कमी होत आहे.
झाडांवर खूप सारे प्राणी, पक्षी यांचे जीवन अवलंबून आहे. कंपन्यांची संख्या वाढत असल्यामुळे जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे प्राण्यांचे जीवन अवघड होतं आहे. माझ्या फांद्यांवर अनेक पक्षी घरटी बांधून विश्रांती घेत असतात. परंतु त्या फांद्या तोडल्यामुळे पक्ष्याची घरटी नाहीशी होतात.
आम्ही झाडे तुम्हाला ऑक्सिजन, औषधें देतो तरीही वृक्षतोड केली जाते. खूप कुटुंबाचा उदरनिर्वाह आमच्यामुळे होतो. माझी फळे विक्रीसाठी घेऊन जातात व त्यातून येणाऱ्या पैश्यामध्ये आपला उदरनिर्वाह केला जातो. अनेक सुशोभीकरणाच्या वस्तू माझ्यापासून तयार केल्या जातात. आम्ही पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यास मदत करतो. मित्रांनो निसर्गावर सर्वांचे जीवन अवलंबून आहे.
अलीकडे काही गोष्टी पाहून मला आनंद होतो. काही लोक वृक्षतोड होत असेन तरी ती होऊन देत नाहीत, वृक्षतोडीस विरोध करतात. कारण वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान मनुष्याला समजले आहे. बाळांनो मी शेवटी एवढंच सांगेन की झाडांमुळे वातावरण स्वछ राहते. तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो. भरपूर लोकांचा उदरनिर्वाह होतो.
प्राणी पक्षी माझ्या मध्ये स्वतःचे घरटे बांधून विसावा घेतात. माझी फळे, फुले विकून तुम्ही सर्वजण तुमचा उदारनिर्वाह करता म्हणून मला वाटते की तुम्हीही माझी काळजी घेतली पाहिजे.
तुम्ही सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. शाळांमध्ये, कॉलेजमध्ये रस्त्यांच्या कडेला झाडे लावली पाहिजे. मला भीती वाटते की मला तोडून टाकले जाईल पण तरीही मी तुमच्या उपयोगी पडेल. मी माझे कर्तव्य नेहमी करत राहील तसेच तुम्हीही तुमचे कर्तव्य करत राहा.
निष्कर्ष
झाडे मानवासाठी उपयुक्त असूनही त्यांची तोड केली जाते. झाडे आपल्याला सावली, ऑक्सिजन, औषधे, फळे देतात आणि पर्यावरणाचे रक्षण करतात. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
मित्रांनो, आम्ही आशा करतो की “मी झाड बोलतोय मराठी निबंध | Mi zad boltoy nibandh marathi” हा निबंध तुम्हाला नक्की आवडला असेल.
वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.